ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात अनेकांना सुर्यप्रकाश आणि घामामुळे त्वचेवर पुरळ आणि अॅलर्जी होऊ शकते.
अॅलर्जी टाळण्यासाठी अनेक प्रकारचे औषधे आणि क्रिम्सचा वापर केला जातो.
यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स वापरु शकता ज्यामुळे अशा अॅलर्जी होणार नाही.
उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते त्यावेळी त्वचेवर लाल टिपके, मुरुम आणि पुरळ यासारख्या समस्या दिसून येतात.
त्वचेवरील पूरळ दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर वापरा.
अॅलर्जी झालेल्या जागेवर तुरटी लावल्यामुळे पुरळ येत नाही आणि खाज कमी होण्यास मदत होते.
उष्णतेमुळे खाज किंवा अॅलर्जी होत असल्यास बर्फ लावल्यामुळे आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.