Summer Skin Care : ना पपई, ना केळी; उन्हाळ्यात लावा 'या' फळाचा फेसपॅक, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Shreya Maskar

समर स्किन केअर

ताडगोळा फेस पॅक हा उन्हाळ्यात त्वचेला ताजेतवाने करतो. त्वचेला आर्द्रता देतो. तसेच उन्हामुळे काळी पडलेली त्वचा गुलाबासारखी कोमल आणि हिऱ्यासारखी चमकदार होते.

Summer Skin Care | pinterest

ताडगोळा फायदे

ताडगोळा उन्हामुळे भाजलेल्या त्वचेला आराम देतो, मुरूमे, पिंपल्स कमी करतो आणि त्वचेची छिद्रे भरून काढतो. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Tadgola | yandex

ताडगोळा फेस पॅक

ताडगोळा सोलून त्याचा गर काढून घ्या. त्यानंतर तो गर ब्लेंडरमध्ये वाटून घ्या. त्यात १ चमचा मध किंवा कच्चे दूध मिसळा. मिश्रण एकजीव झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा.

Tadgola Face Pack | yandex

फेस पॅक लावण्याची पद्धत

ताडगोळ्याचा फेस पॅक १५-२० मिनिटे तसाच चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यानंतर त्वचेला मॉइश्चराइजर लावा. आठवड्यातून २-३ वेळा हे वापरा.

Face Pack | pinterest

हायड्रेट त्वचा

ताडगोळ्यामुळे त्वचेतील ओलावा पुन्हा भरतो, ज्यामुळे कोरड्या किंवा उन्हामुळे भाजलेल्या त्वचेला पोषण मिळते.

Hydrated Skin | pinterest

थंड त्वचा

ताडगोळेचा थंडपणा उष्णतेमुळे येणारे पुरळ, घामोळे आणि उन्हामुळे झालेली लालसर त्वचा थंड करते.

Skin | pinterest

वृद्धत्व विरोधी

ताडगोळे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे कोलेजन वाढवतात आणि तारुण्य पूर्ण चमक मिळवण्यासाठी फ्री रॅडिकल्सशी लढतात. तसेच अतिरिक्त तेल नियंत्रित करतात.

skin care | pinterest

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Summer Skin Care | pinterest

NEXT : गुळाचा छोटासा तुकडा तुमचा चेहरा करेल चमकदार, कसा करायचा वापर?

Summer Skin Care | saam tv
येथे क्लिक करा...