Summer Skin Care : सनस्क्रीन लावूनही कडक उन्हात चेहरा काळवंडला, टॅनिंग घालवण्यासाठी करा 'हा' रामबाण उपाय

Shreya Maskar

त्वचा तज्ज्ञांचे मत

त्वचा तज्ज्ञांच्या मते, सनस्क्रीन लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन लावल्यानंतर तुमची त्वचा अधिक काळसर दिसत असेल तर कमी झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड असलेले सनस्क्रीन निवडा.

Expert Opinion | pinterest

टिंटेड सनस्क्रीन

टिंटेड सनस्क्रीन हा देखील एक उत्तम पर्याय आहे. टिंटेड सनस्क्रीन सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते. त्वचेचा रंग उजळ करण्याचे काम करते. टिंटेड सनस्क्रीन तेलकट त्वचेसाठी अधिक चांगली आहे.

Tinted Sunscreen | pinterest

फेस मास्क १

दह्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड सौम्य एक्सफोलिएंट म्हणून काम करते, तर लिंबामधील व्हिटॅमिन सी त्वचेचा काळपटपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हा दही-लिंबाचा फेस मास्क आठवड्यातून १-२ वेळा लावा.

Face Pack | pinterest

फेस मास्क २

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर शुद्ध, ताज्या कोरफडीचा गर लावा आणि सकाळी धुवा. कोरफडीमध्ये एलोइन नावाचा नैसर्गिक रंग द्रव्य कमी करणारा घटक असतो. जो तुमची काळवंडलेली त्वचा चमकदार बनवतो.

Face Pack | pinterest

हळद-दही

बाऊलमध्ये हळद, दही, कोरफडीचा गर मिसळा. पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी आणि त्वचेला चमक आणण्यासाठी १०-१५ मिनिटे मास्क म्हणून लावा.

Turmeric | yandex

बटाट्याचा रस

चेहऱ्यावर कच्च्या बटाट्याचा रस किंवा पातळ काप लावा, कारण त्यात नैसर्गिक घटक त्वचा उजळ करण्यास मदत करतात.

Potato | yandex

काकडी

उन्हामुळे खराब झालेल्या त्वचेला आराम देण्यासाठी आणि उजळ करण्यासाठी काकडीचा रस आणि दुधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावा. रात्री चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा, जेणेकरून सनस्क्रीन आणि घामाचे सर्व अंश निघून जातील.

Cucumber | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

disclaimer | pinterest

NEXT : ना पपई, ना केळी; उन्हाळ्यात लावा 'या' फळाचा फेसपॅक, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Summer Skin Care | saam tv
येथे क्लिक करा...