Ayurvedic Ubtan : उन्हाळ्यात टॅनिंगचं टेन्शन सोडा; करा 'हा' आयुर्वेदिक रामबाण उपाय, त्वचा मिनिटांत उजळेल

Shreya Maskar

आयुर्वेदिक उटणे

आयुर्वेदिक उटणे बनवण्यासाठी एका स्वच्छ काचेच्या बरणीत बेसन, मसूर डाळीची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर , हळद, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर ,कडुलिंबाची पावडर, चंदन पावडर, तुळशी पावडर मिक्स करून ठेवा.

Ayurvedic Ubtan | yandex

पावडर तयार

यात अजून तांदळाचे पीठ, ओट्सचे पीठ, मुलतानी माती, आवळा पावडर, कॉफी पावडर , सुक्या जास्वंदीची पावडर मिक्स करा. अशाप्रकारे आयुर्वेदिक पावडर तयार झाली.

Rice flour | yandex

महत्त्वाची टीप १

तुमची त्वचा कोरडी असेल तर या पावडरमध्ये दूध, दही किंवा मध मिक्स करा.तेलकट त्वचा असेल तर गुलाबजल आणि कोरफड जेल वापरा. तसेच यात मध घालू नका.

Rose | yandex

महत्त्वाची टीप २

त्वचा अति संवेदनशील असेल तर संत्र्याची पावडर, कॉफी वापरणे टाळा. त्या ऐवजी कोरफड आणि गुलाब पाणी वापरा. तसेच मुलतानी मातीचे प्रमाण कमी करा.

Multani Mitti | yandex

लावण्याची पद्धत

४-५ चमचे तयार पावडर घ्या. त्यात तुमच्या स्किन टाइपनुसार पदार्थ मिक्स करून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार फेस पॅक तुमच्या हातांना, पायांना आणि मानेला लावा.

honey | yandex

चेहरा स्वच्छ करा

फेस पॅक १०-१२ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याचा वापर आठवड्यातून २-३ वेळा करा. जेणेकरून तुमचा चेहरा ग्लो करेल आणि हेल्दी राहील.

Cleanse Your Face | yandex

फायदे

हे आयुर्वेदिक उटणे लावून त्वचेवरील मृत पेशी हळूहळू कमी होतात. त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.टॅनिंग कमी होते. त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. नैसर्गिक चमक मिळते.

Benefits | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Benefits | yandex

NEXT : ब्युटी पार्लरमध्ये 1000-1500 घालवण्यापेक्षा घरीच करा 'असा' फेशियल, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Homemade Facial | yandex
येथे क्लिक करा...