Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की विविध प्रकारचे सरबत प्यायले जातात.
आवळा सरबत हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
आवळा सरबत घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
आवळा सरबत बनवण्यासाठी आवळा, साखर, आले, लिंबू, काळे मीठ, पाणी हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुवून त्याचा बारीक किस करून घ्या.
नतंर किसलेले आवळे मिक्सरमध्ये बारीक करा नंतर एका सूती कापडावर घालून पिळून घ्या आवळ्याचा रस काढून घ्यावा.
नंतर यामध्ये रसच्या दुप्पट प्रमाणात साखर घ्या
गॅसवर एका भांड्यात थोडे पाणी घालून पाक आवळ्याचा पाक बनवा.
पाकसाठी आल्याचा रस किंवा किसलेले आले घालून मीठ व काळे मीठ घाला. पाकला बुडबुडे आले की गॅस बंद करावा.
आता पाक कोमट झाला की त्यात लिंबाचा रस व आवळ्याचा रस घालून सारखे ढवळून घ्या.
सरबत करताना एका ग्लास मध्ये आवळा सरबत घालून त्यात पाणी घालावे. ह्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार हवे असेल त्याप्रमाणे घ्यावे. छान सरबत तयार आहे.