ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला की खूप जास्त उकाडा जाणवतो.
उन्हाळ्यात उष्ण वातावरण असल्याने काही पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ शरीरासाठी चांगले नसतात.
उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाऊ नये. जास्त मसालेदार पदार्थ खालल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.
उन्हाळ्यात सुका मेवा जास्त खाऊ नये. सुक्या मेवा जास्त प्रमाणात खालल्याने उष्णता निर्माण होते.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये. मीठाच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार होऊ शकतात.
उन्हाळ्यात मासांहार खाणे टाळावे. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे पोट आणि त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.
उन्हाळ्यात फास्ट फूड खाऊ नका. त्यात जास्त प्रमाणात चरबी, सोडियम असते. त्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा