Summer Saree Collection : ऑफिस असो वा पार्टी, उन्हाळ्यात दिसा कूल अन् स्टायलिश; एकदा 'या' ५ सुंदर साड्या ट्राय कराच

Shreya Maskar

लिनन साडी

ऑफिस मिटिंगसाठी लिनन साड्या बेस्ट ऑप्शन आहे. लिनन कापड घाम लवकर शोषून घेते आणि शरीराला थंड ठेवते. आकाशी निळा, क्रीम, फिकट राखाडी किंवा बेबी पिंक यांसारख्या रंगांमधील लिनन साड्या नेसा.

Linen Saree | pinterest

शिफॉन साडी

फुलांच्या प्रिंटच्या आणि फीकट रंगाच्या शिफॉन साड्या खूप सुंदर दिसतात. लंच डेट किंवा ऑफिस पार्टीसाठी बेस्ट आहेत.

Chiffon Saree | pinterest

कोटा डोरिया साडी

राजस्थानच्या प्रसिद्ध कोटा डोरिया साड्या त्यांच्या नाजूक 'खट' (tiny squares) नावाच्या जाळीदार विणकामासाठी, हलक्या वजनासाठी आणि सुती-रेशमी धाग्यांच्या मिश्रणासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही केशरी, पांढरी किंवा फिकट लाल रंगाची कोटा डोरिया नेसू शकता.

Kota Doria Saree | pinterest

ऑर्गन्झा साडी

ऑर्गन्झा साडी राजेशाही आणि आकर्षक दिसते आणि वजनानेही बरीच हलकी असते. लॅव्हेंडर, पीच या फिकट रंगाच्या साडीची निवड करा. नाजूक रेशमी कामासह असलेल्या ऑर्गन्झा साड्या खूप मोहक आणि स्टायलिश लूक देतात.

Organza Saree | pinterest

सुती साडी

तुमच्या रोजच्या ऑफिस वापरासाठी शुद्ध सुती किंवा मलमलच्या साडीपेक्षा उत्तम काहीही नाही. हे कापड त्वचेला खूप मऊ लागते. हे घाम शोषून घेणारे कापड आहे, ज्यामुळे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताजेतवाने वाटते.

Cotton Saree | pinterest

जॉर्जेट साडी

ऑफिस पार्टी असो किंवा संध्याकाळी कोणाच्या घरी जेवायला जायचे असो जॉर्जेट साडी हा एक उत्तम पर्याय आहे. ती तुमच्या फिगरवर व्यवस्थित बसते आणि तुम्हाला स्लिम आणि आकर्षक लूक देते.

Georgette Saree | pinterest

सिल्क-कॉटन ब्लेंड साडी

सिल्क-कॉटन ब्लेंड साडीमध्ये कॉटनचा आराम आणि सिल्कची हलकी चमक दोन्ही मिळतात. ग्रे, बेज रंगांमध्ये साडीची निवड करा.

Silk-Cotton Blend Saree | pinterest

ब्लाउज डिझाइन

उन्हाळ्यात आरामदायक आणि स्टायलिश लूकसाठी स्लीव्हलेस, बोट नेक, बॅकलेस डोरी, हॅल्टर नेक, आणि कॉटनच्या लाईटवेट ब्लाउज डिझाइन्स उत्तम आहेत.

Blouse Designs | pinterest

NEXT : रश्मिका मंदानाच्या 'कोडवा' स्टाइल साडीची बातच न्यारी; 'अशी' नेसा, सर्वजण पाहातच राहतील

Rashmika Mandanna Coorgi Saree | instagram
येथे क्लिक करा...