Shreya Maskar
साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना कोडवा स्टाइल साडीत खूपच सुंदर दिसते. तिची ही फॅशन सोशल मीडियावर खूप व्हायरल होते. कोडवा स्टाइल साडी कशी नेसावी, जाणून घेऊयात.
कर्नाटकातील कोडगू (कूर्ग) भागातील कोडवा साडी फॅशन ही एक पारंपरिक, वैशिष्ट्यपूर्ण ड्रेपिंग शैली आहे.
'कोडवा' साडी नेसताना निऱ्या हा महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रीयन साडीत निऱ्या पुढच्या बाजूला खोचतात, मात्र 'कोडवा' साडीच्या निऱ्या बरोबर मागच्या बाजूने खोचल्या जातात.
'कोडवा' साडी नेसताना साडीचा डाव्या खांद्यावरून सोडलेला पदर मागच्या बाजूने ओढून उजव्या खांद्यावर आणला जातो.
कोडवा स्टाइल साडीचा पदर पिन किंवा ब्रोच लावून सेट करा. ही साडी तुम्ही लग्न-समारंभाला आवर्जून नेसू शकता. सर्वत्र तुमच्या फॅशनची चर्चा होईल.
कोडवा स्टाइल साडीवर 'कुप्प्या' पद्धतीचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो. तुम्ही यात सुंदर रंगसंगतीची निवड करा. तुम्ही सुंदर पारंपरिक दागिन्याने हा लूक पूर्ण करू शकता. पारंपरिक लूकसाठी कमरेला बेल्ट लावा.
कोडवा स्टाइल साडीसोबत लांब बाह्यांचा, जॅकेट-शैलीचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो. कोडवा स्टाइल साडीत सॅटिन किंवा सिल्क कापड जास्त शोभून दिसते.
कोडवा स्टाइल साडी वैशिष्ट्यपूर्ण नेसण्याच्या पद्धतीमुळे आणि समृद्ध रंगांमुळे ओळखली जाते, ज्यात सहसा गडद लाल, मरून, गडद हिरवा आणि नारंगी रंगांना सोन्याच्या जरीच्या बॉर्डरसह प्राधान्य दिले जाते.