Manasvi Choudhary
उन्हाळ्यात घामाने केस गळती होण्याची समस्या वाढत आहे.
केस गळतीवर घरगुती उपाय केल्याने केस गळती कमी होईल
नारळाचे तेल केस गळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. जर केसांना नारळाच्या तेलाने मसाज केला तर प्रथिनांची क्षती रोखली जाते तसेच केस मऊ आणि सतेज होण्यास मदत होते
केसांना कांद्याचा रस लावला तरी केसांच्या वाढीस मदत होते आणि पर्यायाने टक्कल कमी होण्यास मदत होते
मेथी वाटून तिची पाण्यात पेस्ट केली आणि ती केसांना लावली तरी केस गळणे कमी होण्यास मदत होते.
बीट आणि मेंदी पावडर ह्यांना एकत्र पाण्यात कालवून, त्यांची पेस्ट केसाला लावल्यास केस गळने कमी होते.
कोरफड केसांचे गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे. कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात.
आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते तसेच केसांना चमक येते.