Shreya Maskar
उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या. उन्हाळ्यात उन्हामुळे केस राठ आणि कोरडे होतात. त्यामुळे त्यांच्या विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात राठ झालेले केस सिल्की बनवण्यासाठी दही आणि मध मिक्स करून हेअर मास्क बनवा. मध चिकट असल्यामुळे तो केसांना लावताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि फॅट्स असतात, जे केसांना खोलवर कंडीशनिंग करतात. ते टाळूवरील घाण स्वच्छ करते आणि कोरडेपणा दूर करून केसांना नैसर्गिक चमक देते.
मध एक नैसर्गिक ह्यूमेक्टेंट आहे, जो केसांमधील ओलावा टिकवून ठेवतो. ते केसांना हायड्रेटेड ठेवतो आणि त्यांना रेशमी बनवतो.
एका वाटीत अर्धा कप ताजे दही घ्या. तुमचे केस लांब असल्यास तुम्हाला जास्त दही वापरावे लागेल. त्यात २ मोठे चमचे शुद्ध मध घाला.
एक गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत मिश्रण चांगले फेटून घ्या, जेणेकरून तो तुमच्या केसांना चिकटणार नाही. हा हेअर मास्क तुम्ही महिन्यातून दोन-तीन वेळा लावू शकता.
तयार हेअर मास्क तुमच्या केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. सुमारे ३०-४० मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.