Shreya Maskar
केसांची झटपट वाढ पाहिजे असेल तर राइस शॅम्पू लावा. राईस शॅम्पूमध्ये अमिनो ॲसिड आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे केस चमकदार होतात. त्यात इनोसिटोल नावाचे कार्बोहाइड्रेट असते, जे खराब झालेले केस आतून दुरूस्त करते. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
राईस शॅम्पू नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करते, ज्यामुळे केस गुंतत नाहीत. राईस शॅम्पू नियमितपणे वापरला, तर टाळूचे पोषण होते आणि केस वेगाने वाढतात.
तांदळाचा शॅम्पू बनवण्यासाठी तांदूळ, पाणी, नेहमीचा शॅम्पू इत्यादी साहित्य लागते. मात्र याचे योग्य प्रमाण घ्या.
तांदळाचा शॅम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्यावरील कोणतीही घाण आणि मळ निघून जाईल.
आता तांदूळ दोन कप पाण्यात भिजवा आणि किमान २ ते ३ तास तसेच ठेवा. सर्वोत्तम परिणामांसाठी, तुम्ही ते रात्रभर भिजवू शकता. जेव्हा पाणी थोडे पांढरे आणि घट्ट होईल, तेव्हा तांदूळ गाळून पाणी वेगळे करा.
एका लहान वाटीत आवश्यक तेवढा शॅम्पू घ्या, त्यात तांदळाचे पाणी घाला आणि चांगले मिसळा. तुमचा राईस शॅम्पू तयार आहे.
केस धुवताना साध्या पाण्याने ओले करा. त्यानंतर राईस शॅम्पू टाळूवर (मुळांवर) आणि केसांच्या लांबीवर लावा. २-३ मिनिटे हळुवारपणे मसाज करा.
शेवटी तुमचे केस थंड किंवा साध्या पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवा. त्यांना कंडीशनर लावा आणि कोरडे करा.