Hair Care : उन्हाळ्यात डोके खाजवून हैराण झालात? 'हा' आहे कोंड्यावर रामबाण उपाय

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळ्यात जास्त घाम, वाढलेली आर्द्रता आणि उष्णता यामुळे टाळूला वारंवार खाज येते. घामामुळे टाळूवर धूळ आणि तेल जमा होऊन बुरशीजन्य संसर्ग होतो.

Summer | yandex

टाळूला वारंवार खाज येते

तसेच केसांची अस्वच्छता, कोंडा, त्वचेचा कोरडेपणा यांमुळे देखील टाळूला खाज येते. यावर रामबाण घरगुती उपाय, जाणून घेऊयात.

Frequent Scalp Itching | pinterest

कांद्याचा रस

टाळूची खाज कमी करण्यासाठी कांद्याचा रस टाळूवर लावा आणि मालिश करा. त्यानंतर केस धुवा तुम्हाला खाजेपासून आराम मिळेल. केस चांगले कोरडे करा.

Onion Juice | yandex

कडुलिंब

टाळूची खाज कमी करण्यासाठी कडुलिंब आणि जास्वंदीची पाने पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे आटवा. तुम्ही या पाण्याने केस धुवा. जिवाणूनाशक आणि दाहशामक गुणधर्मांनी समृद्ध असलेले हे पाणी टाळूची खाज कमी करेल.

Neem | yandex

कापूर

नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने टाळूच्या खाजेपासून आराम मिळू शकतो. आठवड्यातून दोनदा याने मालिश केल्यावर, केसांची चांगली वाढ होते. कापूर टाळूच्या संसर्गावर उपचार करण्यास मदत करतो.

Camphor | yandex

दह्याचा वापर

दह्यामध्ये जिवाणूनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे टाळूवर मालिश केल्याने केवळ खाजच कमी होत नाही तर तुमचे केस चमकदार देखील होतात.

Yogurt | yandex

पांढरे व्हिनेगर

टाळूची खाज कमी करण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करा. पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि त्या पाण्याने तुमचे केस स्वच्छ धुवा. जर खाज जास्त असेल, तर तुम्ही हे पाणी काही वेळ केसांवर तसेच ठेवू शकता.

Vinegar | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care | yandex

NEXT : कुरळ्या केसांची घरीच करा 'अशी' स्ट्रेटनिंग, सर्वजण विचारतील रेशमी केसांचे रहस्य

Tips To Straighten Curly Hair | saam tv
येथे क्लिक करा...