Shreya Maskar
तुम्ही पार्लरशिवायही घरीच केस कर्ल्स करू शकता. सिंपल उपाय जाणून घ्या, जेणेकरून तुमचे केस सुंदर दिसतील आणि त्यांना कोणतीही हाणी होणार नाही.
रात्रभर केसांची वेणी घालून तुम्ही नैसर्गिक कुरळे केस मिळवू शकता. रात्री केस लहान भागांमध्ये विभागून घट्ट वेण्या घाला आणि रबर बँडने बांधा. सकाळी तुमच्या बोटांनी हळूहळू वेण्या सोडा आणि त्यांना सेट करा.
जर तुम्हाला हीट शिवाय केस कर्ल करायचे असतील तर रिकाम्या सोडा कॅनचा वापर करा. तुमचे केस लहान भागांमध्ये विभागा आणि प्रत्येक भाग एका कॅनभोवती गुंडाळा. बॉबी पिन्सने बाहेर आलेले केस बांधा. त्यावर थोडा हेअर स्प्रे मारा. त्यानंतर केस सोडा.
जुना टी-शर्ट किंवा सॉक्स घ्या, त्याच्या लांब पट्ट्या कापा. तुमचे केस धुवा आणि हलके वाळवा. नंतर प्रत्येक भाग पट्ट्यांभोवती गुंडाळा आणि गाठ मारा. ४-५ तासांनंतर मऊ कुरळे केस मिळतील.
तुमचे केस दोन भागांमध्ये विभागा आणि प्रत्येक बाजूला एक अंबाडा घाला. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी ते सोडा, म्हणजे तुम्हाला नैसर्गिक, कुरळे केस मिळतील.
तुमचे केस धुवून वाळवा आणि त्याचे दोन भाग करा. नंतर दोन्ही भाग घट्ट पिळा त्यांना वरच्या दिशेने पिळा आणि क्लिप लावा. रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते सोडा म्हणजे तुम्हाला नैसर्गिक कुरळे केस मिळतील.
केस रोलर्समध्ये गुंडाळा आणि ४-५ तास तसेच ठेवा. वेगवेगळ्या आकाराचे रोलर्स वापरून लहान किंवा मोठे कुरळे केस होतील. तुमचे केस काळजीपूर्वक काढा आणि हाताने सेट करा.
केसांना वारंवार उष्णता दिल्याने केसांमधील ओलावा नष्ट होतो आणि केराटिन प्रथिनांचे विघटन होते, परिणामी केस कोरडे, ठिसूळ आणि नाजूक बनतात.
NEXT : केमिकल नाही नैसर्गिक पद्धतीने केसांना करा रंग, घरी 'असा' बनवा हर्बल हेअर कलर