Shreya Maskar
बीटरूट टाळूतील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळतात. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस पातळ होण्याच्या समस्येवरही मदत होते.
बीटरूटमध्ये लोह आणि फोलेट असते, जे ॲनिमियामुळे होणारी केसगळती रोखण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात बीटरूटचा समावेश करा.
बीटरूटमध्ये दाह-विरोधी आणि बुरशी-विरोधी गुणधर्म आहेत, जे टाळूला आराम देतात आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.
बीटरूट केसांना हलकी लाल किंवा बरगंडी रंगाची छटा देते, जी उन्हात अधिक उठून दिसते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात हा हेअर कलर नक्की करा.
बीटरूटचा हेअर कलर बनवण्यासाठमोठे बीट चिरून घ्या आणि ज्यूसर किंवा ब्लेंडरमध्ये वाटून त्याचा रस काढा. त्याची पेस्ट बनवण्यासाठी यात २ चमचे खोबरेल तेल मिक्स करा.
तयार मिश्रण तुमच्या केसांना, विशेषतः ज्या भागांवर तुम्हाला रंग हवा आहे, त्या भागांवर व्यवस्थित लावा. तुमचे केस शॉवर कॅपने झाका. रंग केसांमध्ये मुरण्यासाठी १ ते २ तास तसेच ठेवा. त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा.
कलर लावल्यावर लगेच शॅम्पू करू नका. रंग टिकून राहावा यासाठी किमान २४ तासांनंतर शॅम्पू करा.
काही लोकांना बीटरूटची ॲलर्जी असू शकते. म्हणून तयार केलेल्या रंगाची पॅच टेस्ट करा आणि मगच केसांवर लावा.