Summer Hair Care : कोरियन लोकांची त्वचाच नाही तर केसही असतात सुंदर, चमकदार केसांसाठी फॉलो करा 'हे' हेअर केअर रूटीन

Shreya Maskar

मालिश करा

डोक्याला मालिश केल्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते आणि केस अधिक जाड, निरोगी आणि मजबूत बनतात.

Massage Your Scalp | pinterest

स्कॅल्प ब्रश

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी गोलाकार गतीने डोक्याला मालिश करा. मालिश करताना बोटांचा किंवा स्कॅल्प ब्रशचा वापर करा.

Scalp Brush | pinterest

हेअर मास्क

हेअर मास्क केसांना खोलवर कंडिशनिंग देते. केळी, मध आणि अंड्याचा पिवळा बलक मिक्स करून हेअर मास्क बनवा आणि केसांना लावा. केसांची वाढ होऊन आणि चमकही येईल.

Hair Mask | pinterest

केळ्याचे फायदे

केळ्यांमधील सिलिका कोरडेपणा आणि कोंडा कमी करून केसांना मऊ आणि चमकदार बनवू शकते. आठवड्यातून एकदा तुमच्या केसांना केळ्याचा हेअर मास्क लावा.

Bananas | pinterest

रेशमी उशा

रेशमी उशीचे (Pillow) कव्हर वापरणे केस आणि त्वचा या दोन्हींसाठी फायदेशीर आहे. रेशमी उशीचे कव्हर ८ तासांच्या हेअर मास्कप्रमाणे काम करते.

Silk Pillowcases | pinterest

रेशमी उशीचे फायदे

रेशमी उशीवरील नैसर्गिक रेशमाचे धागे तुमच्या केसांना ओलावा आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. तर कव्हरमध्ये असलेले अमिनो ॲसिडचे मिश्रण रात्रभर केसांना मुलायम बनवते.

Benefits of Silk Pillowcases | pinterest

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमिनो ॲसिडने समृद्ध असते. तांदळाचे पाणी केसांच्या वाढीस चालना देऊन त्यांना मजबूत करते, ज्यामुळे केसांना चमक येते.

Rice Water | pinterest

तांदळाचे पाण्याचे फायदे

तांदळाच्या पाण्यातील इनोसिटोल केसांचे नुकसान दुरूस्त करण्यास आणि केस गळणे कमी करण्यास मदत करते. हे हेअर केअर रूटीन तुम्ही उन्हाळ्यात आवर्जून फॉलो करा.

Benefits of Rice Water | pinterest

NEXT : डोक्यावर टक्कल पडू लागलंय? आताच करा 'हा' रामबाण उपाय, नवे-घनदाट केस उगवतील

Summer Hair Care | saam tv
येथे क्लिक करा...