Shreya Maskar
डोक्यावर टक्कल पडण्याची मुख्य कारणे म्हणजे आनुवंशिकता , हॉर्मोन्सचे असंतुलन, वाढते वय, आणि चुकीची जीवनशैली होय. त्यामुळे वेळीच उपाय करून केस गळती रोखा आणि घनदाट केस मिळवा.
कांद्यामधील उच्च सल्फरचे प्रमाण टाळूतील रक्तसंचार उत्तेजित करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. एक कांदा वाटून त्याचा रस काढा आणि तो टक्कल पडलेल्या भागावर १५-२० मिनिटे लावा. हे नियमित लावल्याने काही आठवड्यात लहान लहान केस उगवतील.
कांद्याप्रमाणेच लसणामध्येही सल्फर भरपूर प्रमाणात असते. लसूण केवळ संसर्गच टळत नाही, तर केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कोलेजनच्या निर्मितीलाही चालना मिळते. लसणाच्या पाकळ्या वाटून घ्या. त्यात थोडे खोबरेल तेल घाला. ते हलके गरम करून टक्कल पडलेल्या भागावर लावून मालिश करा. यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते.
खोबरेल तेल केसांसाठी वरदान आहे. कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड्स केस गळणे कमी करतात. खोबरेल तेलमध्ये कढीपत्ता घालून चांगले उकळून घ्या. तयार तेलाने आठवड्यातून दोनदा डोक्याला मालिश करा. जेणेकरून टाळूचा कोरडेपणा दूर होईल आणि केसांची वाढ होईल.
कोरफडीमध्ये प्रोटियोलिटिक एंजाइम असतात, जे टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी दुरूस्त करण्यास मदत करतात. तसेच ते टाळूची पीएच पातळी संतुलित ठेवतात. शुद्ध कोरफडीचा गर थेट टाळूवर लावा. यामुळे केसांची मुळे मोकळी होतात आणि दाह कमी होतो, परिणामी केस गळती थांबते.
मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक आहेत. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या विरळ भागांवर मास्कप्रमाणे लावा. यामुळे हळूहळू केस येऊ लागतील.
डोक्यावर टक्कल पडल्यास प्रथिने , लोह , ओमेगा-३ आणि जीवनसत्त्वे युक्त आहार घ्या. दररोज अंडी, पालक, मासे, सुकामेवा, दही, आणि कडधान्ये खा. आवळा आणि रोजमेरी तेलाने मालिश करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.