Shreya Maskar
तुमच्या आहारात भाताचा समावेश कायम ठेवा. यामध्ये कर्बोदके असतात, जे शरीराला ऊर्जाच देत नाही तर केसांना पोषणही देतात.
केसांच्या वाढीसाठी मोसमी फळे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. पेरू, आवळा आणि आंबा यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील लोहाची पातळी वाढवते.
जेव्हा हीमोग्लोबिन पातळी चांगली असते, तेव्हा त्याचा परिणाम केसांच्या मजबुती, घनता आणि चमक यावरही होतो. त्यामुळे हीमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ खा.
रोजच्या आहारात डाळी आणि कडधान्यांचाही समावेश असावा. मूग, तूर आणि चवळी यांसारख्या कडधान्यांमध्ये अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन बी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्त्वे केसांची मुळे मजबूत करतात आणि केस तुटण्यापासून वाचवतात.
हलीम किंवा ऑलिव्हच्या बिया केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये फॉलिक ॲसिड आणि अनेक आवश्यक पोषक तत्त्वे असतात, जी केस आणि त्वचा या दोन्हीना भरपूर पोषण देतात.
आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून ते किमान ३० मिनिटे तसेच ठेवल्याने टाळूचे पोषण होते. ज्यामुळे केसांची वाढ झटपट होण्यास मदत मिळते.
अंडी, पालक, सुकामेवा (अक्रोड, बदाम), बिया (चिया, फ्लॅक्स सीड्स), मासे, रताळे, दही आणि लिंबूवर्गीय फळे यांचा समावेश आताच डाएटमध्ये करा. केसांची मुळे मजबूत होऊन वाढीस चालना मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.