Shreya Maskar
तुमच्या केसांची टोके (Split ends) ताजी दिसतात, पण डोक्याच्या वरच्या भागाजवळील केस तेलकट दिसतात. टाळूमध्ये सीबम (sebum) जास्त उत्पादन झाल्यामुळे अनेकदा तेलकटपणा येतो.
जर तुमचे केस लवकर तेलकट होत असतील, तर टिश्यू पेपर किंवा ब्लॉटिंग पेपरने तुमच्या टाळूवर ठेवून हळूवारपणे दाब द्या. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाते आणि तुमचे केस सिल्की राहतात.
उन्हाळ्यात तुमचे केस तेलकट होऊ नयेत म्हणून तुम्ही हेअर मिस्ट वापरू शकता. तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करून घरीच हेअर मिस्ट बनवू शकता. हेअर मिस्ट बनवण्यासाठी एक कप गुलाब पाण्यात १०-१५ पुदिन्याची पाने कुस्करून घ्या. त्यात इसेन्शियल ऑइलचे दोन ते तीन थेंब टाका. हे तेल दोन ते तीन दिवस रूम टेंपरेचर ठेवा. आवश्यकतेनुसार ते तुमच्या केसांवर फवारा.
तुम्ही केसांची भांग बदला. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज तुमच्या केसांची भांग एकाच बाजूला पाडत असाल (मधोमध भांग पाडत असाल), तर जेव्हा केस तेलकट दिसतील तेव्हा दुसऱ्या बाजूला भांग पाडण्याचा प्रयत्न करा. केसांची भांग बदल्याने केसांना व्हॉल्यूम येतो आणि तेलकटपणा कमी दिसतो.
हेअर रिंस वापरू शकता. हे तुमचे केस खोलवर स्वच्छ करते आणि त्यांचा तेलकटपणा कमी करते. पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि त्याने तुमचे केस धुवा.
केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी लिक्विड शॅम्पूऐवजी ड्राय शॅम्पू वापरू शकता. यामुळे केस धुण्याची गरज भासत नाही. टाळूवरील अतिरिक्त तेल शोषले जाते.
ड्राय शॅम्पूमुळे तुमच्या केसांना त्वरित ताजेपणा येतो. फक्त हा ड्राय शॅम्पू स्प्रे तुमच्या टाळूवर फवारा आणि काही मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर केस विंचरा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.