Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Shreya Maskar

केसांची वाढ

धावपळीची जीवनशैली, कडक उन्हाळा यांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढले असले तर बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरगुती रामबाण उपाय करा. यामुळे केसांची वाढ झटपट होईल आणि केस चमकदार होतील.

Hair Growth | yandex

उपाय १

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. ते केसांना पोषण देते आणि केसांच्या मुळांमध्ये सहजपणे शिरते, ज्यामुळे मुळांचे नुकसान होत नाही आणि ते तुटत नाही.

hair fall | yandex

खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत

खोबरेल तेल वापरण्यापूर्वी ते थोडे गरम करा. यामुळे तेल टाळूमध्ये सहजपणे शोषले जाते आणि रक्ताभिसरण वाढून केसांची मुळे मजबूत होतात. तसेच केसांची वाढ चांगली होते.

Coconut Oil | yandex

खोबरेल तेल किती वेळा लावावे?

आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मालिश केल्याने तुमच्या केसांची वाढ हळूहळू वाढेल. केसांची घनताही सुधारेल आणि तुमच्या केसांना एक सुंदर चमक येऊ लागेल.

Fast Hair Growth | yandex

उपाय २

तुमचे केस मजबूत करण्यासाठी रोजमेरी तेल देखील एक उत्तम पर्याय आहे. जे केस गळती थांबवते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. त्यात दाहशामक (anti-inflammatory) गुणधर्म आहेत.

Fast Hair Growth | yandex

रोजमेरी तेल लावण्याची पद्धत

रोजमेरी तेल केसांच्या मुळांना लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हे लावल्याचे केस गळती थांबेल आणि १५ दिवसांत केस वाढतील.

Rosemary Oil | yandex

उपाय ३

केसांची घनता वाढवण्यासाठी कोरफड देखील खूप उत्तम आहे. कोरफड तेल एरंडेल किंवा नारळाच्या तेलात मिसळून वापरणे खूप फायदेशीर ठरते.

Fast Hair Growth | yandex

एरंडेल तेलाचे फायदे

एरंडेल तेल टाळूला पोषण देते आणि केसांच्या मुळांना मजबूत करते. त्यामुळे टाळूतील रक्तसंचार वाढतो. एरंडेल तेल नारळ किंवा ऑलिव्ह तेलात मिसळून वापरल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतो.

Hair Oil | yandex

NEXT : रंग लावल्यावरही केस काही दिवसांत पांढरे दिसतात? टेन्शन सोडा अन् 'हा' उपाय आताच करा

Hair Care | yandex
येथे क्लिक करा...