Shreya Maskar
लोक पांढरे केस लपवण्यासाठी हेअर कलर करतात. पण काही दिवसांत केस पुन्हा पांढरे दिसू लागतात. यासाठी तज्ज्ञांनी रूट टच-अप करण्याचा सल्ला दिला आहे.
केसांच्या मुळांना टच-अप करण्यासाठी एक-तृतीयांश प्रमाण वापरा. २० ग्रॅम कलर आणि ३० ग्रॅम कलर डेव्हलपर मिक्स करा.
पांढऱ्या केसांना रंग लावायचा असेल, तेव्हा मुळांजवळ जिथे पांढरे केस दिसतात तिथपर्यंत रंग लावा. मुळांपासून पांढऱ्या केसांची लांबी मोजा आणि फक्त तेवढ्याच भागापर्यंत रंग लावा.
केसांच्या मुळांना रंग लावला जाणे खूप गरजेचे असते. त्यामुळे संपूर्ण केसांना रंग लावण्याऐवजी मुळांना रंग लावा. मुळांच्या खाली, जिथे केस आधीच रंगवलेले किंवा काळे आहेत, तिथे रंग अधिक गडद दिसेल. म्हणून, संपूर्ण केसांना रंग लावण्याऐवजी, फक्त पांढऱ्या केसांच्या मुळांपर्यंतच रंग लावावा.
मुळांना रंग लावताना नेहमी टेल कॉम्बचा वापर करून विभागानुसार रंग लावा. यामुळे तुमच्या केसांच्या प्रत्येक कोपऱ्यातील पांढरे केस गडद होतील.
रूट टच-अपसाठी ही पद्धत वापरल्याने केसांचा रंग फिका पडत नाही आणि मुळांजवळील पांढरे केस रंगाने सहजपणे झाकले जातात. तसेच इतर केसही लवकर सफेद होत नाही.
रंग २०-३० मिनिटे केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांना कंडीशनर लावा. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतील.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.