Summer Hair Care : केस धुवताना 'ही' चूक टाळा, अन्यथा पडेल टक्कल

Shreya Maskar

उन्हाळा

उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. केस वारंवार धुतल्याने ते कोरडे होतात. तसेच लवकर तुटू लागतात. त्यामुळे तरूणपणी टक्कल पडू शकते.

Summer | pinterest

उन्हाळ्यात केस किती वेळा धुवावे?

आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुवा. तुमच्या केसांसाठी योग्य असलेला शॅम्पू वापरा. जसे की कोंडा-मुक्त, ऑइल फ्री

Hair wash | pinterest

केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम

केस धुण्याच्या दोन तास आधी केसांना तेल लावा. त्यानंतर केस धुवा. यामुळे तुमचे केस चमकदार आणि मजबूत राहतील. तसेच केसांना मुळांपासून पोषण मिळेल.

Before Washing Your Hair | pinterest

हेअर मास्क

मध आणि लिंबू एकत्र करून पेस्ट बनवा. ती हलक्या हाताने केसांना लावा आणि थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा हेअर मास्क लावा, यामुळे केस लांब आणि चमकदार होतील.

Hair Mask | pinterest

हेअर सीरम

केस धुतल्यावर केसांना हेअर सीरम लावा. सीरम लावल्यानंतर कोणतेही तेल वापरणे टाळा. शिवाय बाहेर जाताना नेहमी केस कव्हर करा. जास्त केस धुळीमुळे खराब होतात.

Hair Serum | pinterest

महत्त्वाची टिप

केस नेहमी कोमट/थंड पाण्याने धुवा. गरम पाण्यामुळे केसांची मुळ कमकुवत होतात. शाम्पू फक्त टाळूवर लावा. कंडिशनर केसांच्या मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावा.

Important Tip | pinterest

केस कोरडे करा

धुतलेले केस सुकवताना जोराजोरात पुसू नका. घर्षण कमी करण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा. तसेच धुतलेले केस स्टाइल करण्यासाठी जास्त उष्णता असलेले प्रोडक्ट वापरणे टाळा.

Dry Your Hair | pinterest

आयुर्वेदिक

तुम्ही केसांसाठी आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरू शकता. कारण ती नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून बनवले जातात आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम सहसा होत नाहीत.

Ayurvedic Care | pinterest

NEXT : कर्लर मशीनशिवाय केस होतील बाऊन्सी अन् कर्ल्स, घरीच एकदा ट्राय करा 'हे' हीट-फ्री हॅक्स

Tricks For Curling Hair | pinterest
येथे क्लिक करा...