Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात जास्त उकाडा आणि घामामुळे केस खूप कोरडे दिसू लागतात. शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. यामुळे केसांची नैसर्गिक चमक आणि मऊपणा कमी होतो.
वाढलेल्या तापमानामुळे केसांमधील ओलावा कमी होतो. यामुळे केस राट, कमकुवत आणि लगेच तुटतात. ही समस्या टाळण्यासाठी योग्य नैसर्गिक उपाय करणं गरजेचं आहे.
केसांना पुन्हा मऊ आणि सिल्की बनवण्यासाठी एलोवेरा खूप फायदेशीर ठरतो. तो केसांना आवश्यक पोषण देतो आणि स्कॅल्प हायड्रेट ठेवतो. म्हणून उन्हाळ्यात एलोवेराचा वापर नियमित करणं उत्तम आहे.
बहुतेक घरांमध्ये एलोवेराचा रोप सहज उपलब्ध असतो. त्याच्या जेलचा वापर करून आपण घरच्या घरी हेअर मास्क बनवू शकतो. हा मास्क पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित असतो.
एलोवेरा जेलमध्ये १ चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावल्याने केस अधिक मऊ आणि चमकदार होतात. हा उपाय कोरड्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे.
२ चमचे ताज्या एलोवेरा जेलमध्ये १ ते २ चमचे नारळ तेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लांबीपर्यंत नीट लावा. एक तास ठेवून नंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
एलोवेरा आणि दही एकत्र मिसळून स्कॅल्पवर लावा. यामुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते. तसंच स्कॅल्प स्वच्छ आणि निरोगी राहतो.