Shreya Maskar
उन्हाळ्यात शरीराला आरामदायी वाटण्यासाठी कॉटन साड्या नेसा. इतर साड्यांमध्ये खूप गरम होते आणि अस्वस्थ वाटते. त्यामुळे कॉटनच्या साड्यांमुळे हवा खेळती राहते.
भारतात कॉटन साड्यांचे अनेक प्रकार आहेत. कॉटन हलक्या फॅब्रिक आणि आकर्षक डिझाइन्ससाठी ओळखले जातात.
सुती साड्यांमुळे शरीराला आराम, थंडावा मिळतो. उन्हाळ्यात त्वचेला कोणताही संसर्ग होत नाही. कॉटन घाम त्वरित शोषून घेते. कॉटन साड्या हलक्या, मऊ असतात.
कॉटन साड्यांच्या मुख्य प्रकारांमध्ये बंगाल टंट, चंदेरी, माहेश्वरी, कोता डोरिया, संबलपुरी, चेट्टीनाड, मलमल आणि तागाची कॉटन साड्यांचा समावेश होतो.
कॉटन साड्या प्रामुख्याने हातमागावर बनवल्या जातात, ज्यामुळे त्यांना एक अस्सल आणि टिकाऊ स्वरूप प्राप्त होते.
कॉटन साड्यांचा रंग आणि पोत टिकवून ठेवण्यासाठी पहिल्यांदा धुताना मिठाच्या पाण्यात १५-२० मिनिटे साडी भिजवा. त्यानंतर चांगल्या कपडे धुवण्याच्या लिक्विडने स्वच्छ करा.
कॉटनच्या साड्या कडक उन्हाऐवजी सावलीत सुकवा, जास्त जोरात पिळू नका. त्यानंतर मस्त कडक इस्त्री मारा. एका कपड्यांच्या पिशवीत भरून कपाटात ठेवा.
कॉटनच्या साडीवर बोट नेक, हाय कॉलर, पफ स्लीव्हज, आणि थ्री-फोर्थ बाह्यांचे ब्लाउज खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतात. साडीला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज निवडा.