Mental Health : तुमची चुगली करणारेच तुमचे मोठे चाहते, 'या' लोकांपासून चार हात लांबच रहा

Shreya Maskar

गॉसिप करण्याची सवय

लोक अनेकदा आपल्याबद्दल गॉसिप करतात. ज्यामुळे आपल्याला वाईट वाटते. पण गॉसिप करणे हे एका चांगले, भक्कम व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असू शकते. असे बोले जाते की, जे लोक तुमच्याबद्दल गॉसिप करतात तेच सर्वात मोठे तुमचे चाहते असतात.

gossip | yandex

तुमची ओळख

जेव्हा लोक तुमच्याबद्दल बोलतात किंवा गॉसिप करतात, याचा अर्थ ते तुम्हाला नोटीस करतात. तुम्ही गर्दीतून वेगळे उठून दिसता. सामान्य लोकांकडे कोणी लक्ष देत नाही, पण जे काहीतरी वेगळे करतात त्यांच्याबद्दल बोलले जाते.

gossip | yandex

तुलना करणे

जे लोक करोडोच्या गर्दीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. त्यांचा इतर लोकांना अनेकदा हेवा वाटतो. त्यांचे शब्द तुमच्या उणिवा दर्शवत नाहीत, तर तुमची प्रगती दर्शवतात. जर कोणी तुमच्याबद्दल मत बनवत असेल, म्हणजे तुम्ही नक्कीच प्रगती करत आहात. जी व्यक्ती एकाच जागी राहते, ती तुमच्याबद्दल कोणतेही मत बनवत नाही.

gossip | yandex

गॉसिप कोण करते?

ज्या लोकांना तुमचे यश पाहवत नाही अशी लोक तुमच्या बद्दल गॉसिप करण्यात पहिल्या नंबरवर असतात. जे लोक स्वतःच्या कामात व्यस्त नसतात, तेच तुमच्याबद्दल चुगली मारतात.

gossip | yandex

'या' लोकांपासून रहा दूर

ज्या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल त्याच्याशी बोलणे टाळा. जो तुमची तुलना करतो, कायम तुम्हाला असतो, तुमच्यासोबत गोड बोलून तुमच्या बद्दल इतरांना वाईट सांगतो अशा व्यक्त तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.

gossip | yandex

उपाय १

इतर लोक काय विचार करतात याची काळजी करणे सोडा, यामुळे तुमचे लक्ष ध्येयापासून विचलित होते. लोकांचे शब्द मनावर घेण्याऐवजी, त्यांचा उपयोग स्वतःला अधिक कणखर बनवण्यासाठी करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते.

gossip | yandex

उपाय २

जे लोक तुम्हाला खाली खेचू इच्छितात, तेच तुमच्या कठोर परिश्रमाचे कारण ठरू शकतात. त्यांचे शब्द एक आव्हान म्हणून स्वीकारा आणि पुढे काम करत रहा. विरोध न करता आपले काम करत राहणे आणि त्यात यश मिळवणे हेच कोणत्याही टीकेला दिलेले सर्वोत्तम उत्तर आहे.

gossip | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

gossip | yandex

NEXT : विकत कशाला? भांडी धुण्याचा साबण घरीच बनवा, मिनिटांत भांडी लख्ख चमकतील

Homemade Dishwasher | saam tv
येथे क्लिक करा...