Homemade Dishwasher : विकत कशाला? भांडी धुण्याचा साबण घरीच बनवा, मिनिटांत भांडी लख्ख चमकतील

Shreya Maskar

भांडी धुण्याचा साबण

भांडी धुण्यासाठी आपण बाजारातून महागडे साबण खरेदी करतो. मात्र त्याने भांडी नीट स्वच्छ होत नाही आणि हात कोरडे आणि खराब होतात. त्यामुळे घरीच साबण बनवा.

Homemade Dishwasher soap | yandex

घरगुती साबण

घरी बनवलेल्या साबणामुळे भांडी पूर्णपणे स्वच्छ होती आणि चमकतील. तसेच तुमचे हात मऊ राहतील. सोपी पद्धत जाणून घेऊयात.

Homemade Dishwasher soap | yandex

साहित्य

भांडी धुण्याचा साबण बनवण्यासाठी साबणाची वडी, पाणी, व्हिनेगर, मीठ, ग्लिसरीन आणि लिंबू, लॅव्हेंडर, टी ट्री किंवा पेपरमिंट यांसारखे इसेन्शियल ऑइल लागेल.

Salt | yandex

स्टेप १

साबणाची वडी लहान तुकड्यांमध्ये कापा किंवा तुम्ही साबण किसून घ्या. एका भांड्यात साबणाची वडी आणि पाणी घेऊन मध्यम आचेवर गरम करा. मिश्रण उकळणार नाही याची काळजी घेत ते सतत ढवळत राहा.

Homemade Dishwasher soap | yandex

स्टेप २

मिश्रणात व्हिनेगरघाला आणि चांगले मिसळा. व्हिनेगर भांड्यांवरील तेलकटपणा काढण्यास मदत करते. हवे असल्यास, तुम्ही मिश्रणात ग्लिसरीन घालू शकता. यामुळे द्रव घट्ट आणि गुळगुळीत होतो.

vinegar | yandex

स्टेप ३

तुमच्या आवडीच्या इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घाला. तुम्ही लिंबू, लॅव्हेंडर, टी ट्री किंवा पेपरमिंट यांसारखे सुगंधीत पदार्थ घालू शकता. सर्व एकजीव करा. द्रवामध्ये फेस आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून हळू हळू ढवळा.

lemon | yandex

स्टेप ४

मिश्रण साबणाच्या डब्यात ओता. भांडी धुताना १-२ चमचे घाला, पाण्यात मिसळा किंवा थेट स्क्रबरवर लावा. याचा वापर करून तुम्ही झटपट भांडी स्वच्छ करू शकता.

Homemade Dishwasher soap | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Homemade Dishwasher soap | yandex

NEXT : जोडीदार वयाने मोठा असेल तर फरक पडतो? सायकियाट्रिस्टनं दिली महत्त्वाची टिप्स

Marriage | pinterest
येथे क्लिक करा...