Rohini Gudaghe
१ कप वेलची (भिजवलेली), १/४ कप गुलाब जल, १ किलो साखर, अर्धा टीस्पून हिरवा फूड कलर, १ लिटर पाणी, १/४ टीस्पून सायट्रिक अॅसिड (ऐच्छिक)
वेलचीचं सरबत उन्हाळ्यात शरीरसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यासाठी आज आपण वेलचीचं सरबत कसं बनवतात, ते जाणून घेऊ या.
वेलचीचे सरबत बनवण्यासाठी एक कप वेलची रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी एका कढईत एक लिटर पाणी घ्या. त्यात वेलची टाका आणि १५ ते २० मिनिटे उकळवा.
नंतर एक पातळ कापड घेऊन हे पाणी गाळून घ्या. Yandex
गॅसवर कढई ठेवून त्यात गाळलेले पाणी टाका. साखर, गुलाब जल, हिरवा फूड कलर आणि सायट्रिक अॅसिड घालून मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्या.
आता ते पाणी थंड करून बॉटलमध्ये भरा.
सिरप तुम्ही दूध किंवा पाण्यात मिसळून पिऊ शकता. उन्हाळ्यात रिफ्रेशिंग फील देण्यासाठी वेलचीचं सरबत बेस्ट ऑप्शन आहे.