Ruchika Jadhav
आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन शनिवारी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले
यावेळी बागेत ५५ हेक्टर क्षेत्रात ७३ जातींच्या १७ लाख ट्युलिप्स फुलांची लागवड करण्यात आली आहे.
गुलाबाच्या फुलाप्रमाणे मात्र फार अनोख्या आणि सुंदर रंगात ट्युलिप फुलले आहेत.
ट्युलिप्स पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली आहे.
साल २०२३ मध्ये ३.७७ लाख पर्यटकांनी या उद्यानाला भेट दिली होती.
अजुन या बागेतील काही फुले उमलने बाकी आहेत. ही सर्वच फुले बहरल्यावर बागेचं सौंदर्य काही औरच असेल.
इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन असं या बागेचं नाव आहे.
2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उद्यान उभारले.