Manasvi Choudhary
मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्य धोक्यात जाऊ शकते. अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
उन्हाळ्यात नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी यायला सुरूवात होते. उन्हाळ्यात नॉनव्हेज खाणे चुकीचे नसले तरी मात्र यामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो.
शरीरातील उष्णता वाढल्याने त्यात नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात.
उन्हाळ्यात नॉनव्हेज खाल्ल्याने पचनक्रियेवर ताण येतो यामुळे खाणे शक्यतो टाळावे.
नॉनव्हेज पदार्थातील तिखट, तेलकटपणा शरीरासाठी घातक ठरू शकतो यामुळे कमी प्रमाणात खाणे.
उन्हाळ्यात पचायला हलके असे नॉनव्हेजचे पदार्थ खा ज्यामुळे तुमच्या पचनक्रियेवर ताण येणार नाही.
जर तुम्ही नॉनव्हेज खाल्ले असेल, तर दिवसभरात भरपूर पाणी, ताक किंवा लिंबू पाण्याचे सेवन करा, जेणेकरून शरीरातील उष्णता नियंत्रित राहील.