Shreya Maskar
उन्हाळ्यात ऑफिसमध्ये कसे कपडे घालायचे, असा अनेकांना प्रश्न पडतो. या प्रश्नाचे सिंपल उत्तर म्हणजे कॉटन कुर्ती होय. उन्हाळ्यात कॉटन कुर्तीला तुमची फॅशन बनवा.
फ्लोरल प्रिंट कुर्ती खूप आकर्षक दिसते. सुती कापडापासून बनवलेली ही कुर्ती अत्यंत आरामदायक आहे. यात हवा खेळती राहते. ज्यामुळे तुमचे शरीर थंड राहते.
जयपुरी प्रिंटेड कुर्ती दिसायला खूपच आकर्षक आहे. तिचे कापड हलके आणि मऊ असून, त्यावरील प्रिंट्स, नक्षीकाम तिचे सौंदर्य अधिकच वाढवतात.
अनारकली स्टाइलची प्रिंटेड कॉटन कुर्ती आपल्याला एक सुंदर लूक देते. या कुर्तीमध्ये खूप सुंदर रंगसंगती पाहायला मिळते. त्यावरील प्रिंट्स आणि नक्षीकाम कुर्तीचे आकर्षण वाढवते. ऑफिसला जाताना काही मिनिटात ही स्टाइल करता येते.
Relaxed-fit कुर्ता हलक्या आणि आरामदायी आहे. उन्हाळ्यासाठी हा एक उत्तम ड्रेस आहे. ऑफिसला असे छान कुर्ती घातलात तर तुमच्या फॅशनचे कौतुक होईल.
सुती कापडापासून बनवलेल्या मॅक्स स्टाइल स्ट्रेट कुर्तीवर धाग्याचे भरतकाम असते. जे तिचे सौंदर्य आणखी वाढवते. ऑफिस किंवा कॉलेजसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
कॉटन कुर्ती हलक्या वजनाची असते. जी पटकन घाम शोषून घेते, ज्यामुळे खाज सुटणे, उष्माघात आणि इतर त्वचेच्या समस्यांचा धोका कमी होतो.
सर्व प्रकारातल्या कॉटन कुर्ती तुम्हाला कमी किंमतीत आणि खूप व्हरायटीत बाजारात उपलब्ध पाहायला मिळतात. ऑनलाइनही तुम्ही या खरेदी करू शकता. कॉटन कुर्ती स्वस्तात मस्त मिळतात.