Vishal Gangurde
उन्हाळ्यात अनेकांना घामाचा खूप त्रास होतो.
घाम सामान्य समस्या आहे. या काळात शरीर स्वच्छ न ठेवल्यास त्वचेचे आजार आणि संसर्ग वाढू शकतात.
उन्हाळ्यात फेस्क मास्क वापरल्याने मुरुम आणि घाम यासारख्या समस्यांपासून बचाव होतो.
उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीराला थंडावा मिळेल. तसेच शीतपेयांचे सेवन करावे.
उन्हाळ्यात घामावर नियंत्रण ठेवायचे असल्यास योगा केल्यास त्याचा फायदा मिळू शकतो. तसेच दुर्गंधी देखील कमी होते.
उन्हाळ्यात सूती आणि सैल कपडे घातल्याने घामावर नियंत्रण राहते. यामुळे सूर्याच्या अतिनिल किरणांपासून बचाव होतो.
उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने घाम, दुर्गंधी, मृत पेशी यापासून सुटका मिळते.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. तुम्ही अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता