Siddhi Hande
चाट सर्वांनाच खायला आवडतात. त्यातील भेळ हा पदार्थ तर लहान मुलांना खूपच आवडतो.
तुम्ही घरीच स्नॅक्ससाठी छान सुकी भेळ बनवू शकतात. चहासोबत भेळीचा आस्वाद घेऊ शकतात.
कुरमुरे, शेव, भाजलेले शेंगदाणे, तिखट चना डाळ, शेवपुरीची पुरी, मसाला, चाट मसाला,पापडी, लिंबू, कांदा
सर्वात आधी तुम्हाला एका पातेल्यात कुरमुरे घ्यायचे आहे. त्यात तुमच्या आवडीनुसार शेव टाका.
यानंतर यामध्ये चना डाळ, पापडी टाकून छान मिक्स करा. यामध्ये तुम्ही मसाला आणि लाल तिखट टाका.
भेळीत बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू पिळून टाका. ही भेळ छान मिक्स करा.
यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर बारीक चिरलेली मिरची, कैरी टाकू शकतात.
भेळीत शेवपुरीची पुरीदेखील टाका. यामुळे भेळीची चव अजूनच वाढते.