ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हात थंड पाणी किंवा फळांचा ज्यूस प्यायला सर्वांनाच आवडते.
उन्हाळ्यात उसाचा रस हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो.
उसाचा रस खूप गोड असल्याने डायबिटिजच्या रुग्णांनी प्यावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे एनर्जी मिळते.
उस हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. तसेच उसाचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत काम होते.
उसाचा थंडगार रस शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
उसामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
उसात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत होते.
उसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात उसाचे सेवन करु नये.