Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. गरमा गरम चहा बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.
काही जण पाणी उकळतानाच साखर टाकतात, तर काही जण दूध उकळल्यानंतर किंवा कपामध्ये ओतल्यावर साखर घालतात. पण चहा बनवताना नेमकी साखर कधी टाकावी? जाणून घ्या.
पाणी उकळताना जेव्हा चहामध्ये साखर टाकाल, तेव्हा ती पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि चहाला गोड चव येते.
अनेक जण चहात दूध घातल्यानंतर साखर टाकतात. परंतु, दुधामध्ये साखर टाकल्यामुळे दूध आणि चहाच्या योग्य एकत्रीकरण होत नाही. तसेच काही जणांना गोडवा कमी-जास्त असल्याचे वाटू शकते.
चहा पूर्ण उकळून झाल्यानंतर साखर टाकली, तर ती नीट विरघळत नाही आणि चहाची चव एकसारखी लागत नाही. तसेच साखरेचे प्रमाण अचूक बसत नाही.