Siddhi Hande
दिवाळी म्हटल्यावर घराघरा गोडाचे पदार्थ बनवतात. यामध्ये लाडू, शंकरपाळी आणि मिठाईचा समावेश असतो.
दिवाळीत डायबिटीज असणाऱ्यांसाठी शुगर फ्री मिठाई रेसिपी घरी ट्राय करा.
तुम्ही घरी शुगर फ्री रसमलाई बनवू शकतात.
यासाठी तुम्हाला मखाने, ग्रीक दही, केशर, मध, बदाम, इलायची पावडर लागणार आहे.
सर्वात आधी तुम्हाला तूपात मखाने भाजून घ्यायचे आहे. यानंतर मखाने थंड होऊ द्या.
एका वाटीत कोमट पाणी घ्या. त्यात थोडं केसर भिजत घाला.
यानंतर मिक्सरच्या भांड्यात मखाने, भिजवलेले बदाम आणि इलायची पावडर टाका. त्यात केस टाका.
या मिश्रणात साखरेऐवजी मध टाकून मिश्रण मिक्स करा. त्याची बारीक पेस्ट करा.
यानंतर ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवा. हे मिश्रण छान सेट होऊ द्या.
मिश्रण छान सेट झाल्यावर त्यावर ड्रायफ्रुट्सचे काप आणि केसर टाकून मस्त सर्व्ह करा.