Manasvi Choudhary
आजकाल मधुमेह हा आजार अनेकांना उद्भवत आहे. केवळ वयोवृद्धच नाही तरूणांनाही मधुमेहाचा सामना करावा लागतो आहे.
मधुमेह असणारी व्यक्ती गोड पदार्थ खाणे टाळतात आणि त्याऐवजी ते शुगर फ्रि ड्रिंक्सचे सेवन करतात. परंतु तुम्हाला माहितीये का? शुगर फ्रि ड्रिंक आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?
शुगर फ्रि ड्रिंक्सच्या सेवनाने शरीरावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
शुगर फ्रि ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण नसले तरी यात साखरेऐवजी गोडवा देणारी केमिकल्स असतात ज्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
शुगर फ्रि ड्रिंक्सचे फायदे शुगर फ्रि ड्रिंक्समध्ये साखर नसल्याने रक्तातील साखर लगेचच वाढत नाही.
शुगर फ्रि ड्रिंक्समध्ये कमी कॅलरीज असतात त्यामुळे वजन देखील वाढत नाही.
शुगर फ्रि ड्रिंक्सचे दुष्परिणाम कृत्रिम गोडव्यामुळे शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते ज्यामुळे पेशींची इन्सुलिन वापरण्याची क्षमता मंदावते आणि डायबिटीसचा त्रास अधिक वाढू शकतो.
शुगर फ्रि ड्रिंक्सच्या गोडव्यामुळे अनेकदा गोड खाण्याची इच्छा वाढू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.