ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चहा, मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, केक आणि आइसक्रिम अशा टेस्टी पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
मधुमेह रुग्णांनी साखर किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन करु नये.अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढते.
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उर्जेची पातळी कमा होते आणि थकवा किंवा अशक्तपणा येतो.
जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते आणि वजन वाढते.
साखरेचे किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने दात खराब होऊ शकतात. तसेच दाताला किड लागण्याची समस्या होऊ शकते.
साखरेतील डोपामिन केमिकल रिलीज होऊन त्याचा परिणाम मेंदूवर होतो.यामुळे शरीरातील उर्जेचे प्रमाण कमी होते आणी मेंदूवर ताण वाढतो.
अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: वीगन डाएट म्हणजे नक्की काय? यामध्ये काय काय खाऊ शकतो