Ruchika Jadhav
सध्या सिताफळ या फळाचे सिजन सुरू आहे. बाजारात सर्वत्र सिताफळ विकण्यासाठी आलेत.
सिताफळ आईस्क्रिम प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. त्याची चव आपल्याला वर्षभर चाखता येत नाही. त्यामुळे सिजनमध्ये प्रत्येक जण यावर ताव मारतात.
सिताफळ आईस्क्रिम बनवण्यासाठी तुमच्याकडे फ्रेश क्रिम असली पाहिजे. फ्रेश क्रिम सर्वात आधी छान फेटून घ्या.
त्यानंतर यात थोडी मिल्क पावडर मिक्स करा. तुम्ही १ कप क्रिम घेतली तर समान कम दूधाची पावडर वापरा.
सिताफळ चॉपींग बाऊलमध्ये टाकून त्याच्या बिया वेगळ्या करून पल्प बाजूला काढून घ्या.
त्यानंतर पुढे यामध्ये पिठी साखर मिक्स करा. पिठी साखर या मध्ये उत्तम लागते.
तयार मिश्रण एकत्र करून व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवा. अशा पद्धतीने तयार झाली तुमची स्वदिष्ट आईस्क्रिम