Shraddha Thik
सतत सांधेदुखीमुळे तुमचे जीवन कठीण होऊ शकते. याचा परिणाम तुमच्या संपुर्ण आयुष्यावरही होतो.
कालांतराने तुम्हाला चालणे, उठणे आणि धावणेही अवघड होते.
पण काही सोप्या उपायांनी तुम्ही अशा समस्या कमी करू शकता आणि आराम मिळवू शकता.
जसे की चालणे, पोहणे, योगा किंवा सायकल चालवणे यामुळे सांधे सक्रिय राहतात.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एंटी इंफ्लेमेटरी गोष्टी, नट-बिया, दूध इत्यादींचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
शरीराच्या जास्त वजनामुळे सांध्यांवर दबाव येतो, त्यामुळे वजन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसने आराम मिळू शकतो.