Shraddha Thik
अनेक वेळा अशा परिस्थिती उद्भवतात जेव्हा स्त्रिया एकट्या असतात आणि कुठल्याही परिस्थितीत अडकतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना महिलांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
परंतु यासाठी तुमच्याकडे परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या...
महिला संकटात मदत घेण्यासाठी 1090 आणि 1091 (महिला हेल्पलाइन) वर कॉल करू शकतात.
घरगुती हिंसाचाराबद्दल तक्रार करण्यासाठी तुम्ही 181 वर कॉल करू शकता.
चाइल्ड हेल्पलाइनसाठी 1098 वर कॉल करता येईल.
पोलिसांच्या मदतीसाठी तुम्ही 100 किंवा 112 वर कॉल करू शकता.
तुम्ही तुमच्या हक्कांसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला 14433 वर कॉल करू शकता.
रेल्वे प्रवासातील समस्यांसाठी महिला 182 क्रमांकावर कॉल करू शकतात.