Dizziness : चालता चालता अचानक चक्कर आली? घाबरू नका, जीव वाचवण्यासाठी तातडीने करा 'ही' ३ काम

Shreya Maskar

चालताना चक्कर येणे

रस्त्यात चालताना अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा शरीराचा तोल जातो अशा वेळी घाबरून न जात स्वतःला सांभाळा.

Dizziness while walking | pinterest

ताबडतोब चालणे थांबवा

चक्कर येताच रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी थांबा. शक्य असल्यास बसा किंवा झोपा. वाहन चालवत असाल, तर सुरक्षितपणे वाहन बाजूला घ्या.

Stop walking immediately | pinterest

सुरक्षितपणे झोपा

शक्य असल्यास पाठीवर झोपा आणि पाय किंचित उंच ठेवा. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा दुखापत झाल्याची शक्यता असल्यास पाय उंच करू नका. आरामदायी स्थितीत राहा.

sleep safe | pinterest

उष्णतेपासून दूर जा

ऊन लागत असल्यास सावलीत किंवा थंड जागी जा. पूर्ण शुद्धीत असाल आणि सहज गिळता येत असेल, तर थोडे थोडे पाणी प्या.

Get away from heat | pinterest

जवळच्या व्यक्तीची मदत घ्या

एकटे असाल तर आसपासच्या व्यक्तीला मदतीसाठी बोलवा. चक्कर कमी झाली तरी लगेच चालायला सुरुवात करू नका किंवा वाहन चालवू नका.

Get help from someone close to you | pinterest

'ही' लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जा

चालताना चक्कर आली आणि त्यानंतर छातीत दुखणे किंवा धाप लागणे , बोलताना अडचण येणे , एका बाजूचा हात किंवा पाय अचानक कमजोर होणे, तीव्र डोकेदुखी हा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा.

chest pain | pinterest

कारणे काय?

उन्हामुळे, घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. रक्तदाब अचानक कमी होतो. रक्तातील साखर कमी होणे. पुरेसे अन्न किंवा पाणी न घेणे. हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता हे देखील चक्कर येण्यामागचे कारण असू शकते.

What are the reasons? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : लिव्हर खराब होण्यापूर्वी हातांवर दिसतात 'हे' ७ संकेत; लगेच सावध व्हा, नाहीतर...

Liver Damage | AI PHOTO
येथे क्लिक करा...