Manasvi Choudhary
पावसाळ्यात कपड्याची निवड योग्य असणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात रोज कोणते कपडे घालावे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
पावसाळ्यात महिलांनी कॉटर्नचे ड्रेस घातल्यास स्टायलिश आणि कम्फर्टेबल वाटतात. कॉटनच्या ड्रेसेसचे नवीन पॅटर्न्स उपलब्ध आहेत.
कफ्तान स्टाईल गाऊन्स सध्या जास्त ट्रेंडिंग आहेत. हे दिसायला अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल असतात. फ्लोरल किंवा जयपुरी ब्लॉक प्रिंट्स खूप सुंदर दिसतात.
डेली वेअरसाठी ए- लाईन फ्रंट ओपन झिप गाऊन कम्फर्टेबल वाटतो. या गाऊनला घेर असतो, ज्यामुळे मॅंगो प्रिंट, लहरिया किंवा साध्या सुबक डिझाईन्समध्ये हे गाऊन्स उपलब्ध असतात.
गाऊनमध्ये खिसा असणे हे महिलांना अधिक आवडते यासाठी तुम्ही गोल गळ्याचे आणि हाफ स्लीव्ह्जचे गाऊन निवडू शकतात.
ज्यांना खूप घट्ट कपडे आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्लेटेड गाऊन बेस्ट आहे. या गाऊनमध्ये सिंपल सोबर लूक दिसतो.
पावसाळ्यात जर तुम्हाला शॉर्ट गाऊन्स घालायचे असतील तर तुम्ही हे पॅटर्न्स निवडू शकता. यामध्ये कार्टून प्रिंट्स, चेक्स किंवा पोल्का डॉट्स डिझाईन्स खूप सुंदर दिसतात.