Shreya Maskar
स्टफ्ड कारल्याच्या भाजी बनवण्यासाठी कारले, कांदे, टोमॅटो, लसूण, हिरव्या मिरच्या, कैरी, शेंगदाणे, जिरे, मोहरी, हळद, ओवा, पाणी, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
स्टफ्ड कारल्याच्या भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कारले धुवून त्याची साल काढून टाका.
कारले मधून कापून त्यातील बिया काढून टाका.
मिठाच्या पाण्यात कारली टाका, जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होईल.
मसाला तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे, शेंगदाणे, मोहरी आणि कैरी बारीक करून मिक्स करा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो आणि मसाले घालून चांगले परतून घ्या.
तयार सारण कारल्यात भरून शेलो फ्राय करा.
गरमागरम चपातीसोबत स्टफ्ड कारल्याच्या भाजीचा आस्वाद घ्या.