Shreya Maskar
डाळ बनवण्यासाठी तूर डाळ, शेंगदाणे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि हळद इत्यादी साहित्य लागते.
ढोकळी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर, ओवा, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
फोडणी बनवण्यासाठी तेल, जिरे, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, हिंग, हळद, लाल तिखट, गूळ आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
डाळ ढोकळी बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये तूर डाळ, शेंगदाणे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून शिजवून घ्या.
परातीत गव्हाचे पीठ, बेसन, कोथिंबीर, ओवा, हळद, लाल मिरची, धणे पूड, पीठ आणि तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिंग आणि चिरलेला टोमॅटो घालून फोडणी द्या.
कुकरमध्ये शिजवलेली तूर डाळ, धणे पूड, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून डाळ उकळू द्यावी.
दुसरीकडे गव्हाचे पिठाच्या पोळी लाटून त्याचे चौकोनी काप करून उकळत असलेल्या डाळीमध्ये टाका.
एका बाऊलमध्ये डाळ ढोकळी काढून त्यावर साजूक तूप घालून पदार्थाचा आस्वाद घ्या.