Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला स्टफ इडली बनवा.
स्टफ इडली बनवण्यासाठी रवा, तेल, मोहरी, कढीपत्ता, उडीद डाळ, हिरवी मिरची, दही, इनो आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
इडली स्टफिंग बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, आलं, मीठ , तेल आणि बारीक चिरलेला पालक इत्यादी साहित्य लागते.
स्टफ इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा, पाणी, मीठ आणि दही मिक्स करा.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, उडीद डाळ टाकून गोल्डन होईपर्यंत परतून घ्या.
या मिश्रणात हिरवी मिरची आणि मसाले टाकून छान परता.
आता इडलीचा साच्यात पहिले रवा मिश्रण आणि त्यानंतर मसाला टाकून स्टफ इडली शिजवून घ्या.
नारळाच्या चटणीसोबत स्टफ इडलीचा आस्वाद घ्या.