Shreya Maskar
जेवणात विविधता ठेवल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि चवही लागते.
शरीराला पौष्टिक आहार मिळावा, यासाठी नाचणी, बाजरी, ज्वारी अशा धान्यांच्या चपात्या खा.
चपाती बनवताना तुम्ही डाळींचे पीठसुद्धा घालू शकता.
वारंवार गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खाऊ नये.
चपात्यांसाठी तेलापेक्षा साजूक तुपाचा वापर करा.
तुम्ही चपात्या लाटताना त्यात तीळ, सूर्यफुलाच्या बिया यांचा कूट टाकू शकता.
चपातीमधून शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर मिळते.
तुम्ही चपातीचे पीठ जास्त वेळ मळून ठेवू नका, ते खराब होण्याचा धोका वाढतो.