Shreya Maskar
हॉट चॉकलेट बनवण्यासाठी दूध, साखर, कॉर्नफ्लोर , कोको पावडर, दालचिनी, डार्क चॉकलेट इत्यादी साहित्य लागते.
हॉट चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम थंड दुधात साखर, कोको पावडर आणि कॉर्नफ्लोर टाकून मिक्स करा.
दुधात कॉर्नफ्लोरच्या आणि कोको पावडरच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
दुधात दालचिनीचा तुकडा टाकून एक उकळी काढून घ्या.
आता तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रूट्स बारीक करून टाका.
तुम्ही यात व्हाइट चॉकलेट देखील टाकू शकता.
शेवटी दूध छान उकळले की गाळून घ्या.
हॉट चॉकलेटच्या वरून चोको चिप्स टाकू शकता.