Shreya Maskar
जेवणासोबत तोंडी लावायला खास भरलेली मिरची बनवा.
भरलेली मिरची बनवण्यासाठी हिरवी मिरची, शेंगदाणे, बेसन पीठ, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
भरलेली मिरची बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या धुवून मधून कापून बिया काढून घ्या.
एका बाऊलमध्ये भाजलेले शेंगदाणे, बेसन पीठ, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून मसाला तयार करा.
तयार मसाला तेलात टाकून छान परतून घ्या.
आता परतलेला मसाला कापलेल्या मिरचीत भरून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मिरची खरपूस तळून घ्या.
शेवटी भरलेली मिरची कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.