Shreya Maskar
पापड करी बनवण्यासाठी पापड, धने पावडर, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मोहरी, जिरे, हिंग, तेल, पाणी, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
पापड करी बनवण्यासाठी सर्वप्रथम पापड तळून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्या.
फोडणी तडतडली की यात टोमॅटो, धने पावडर, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.
मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात पाणी आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
पापडचे लहान तुकडे करून करीमध्ये टाकून शिजवून घ्या.
गरमागरम पापड करी कोथिंबीरने सजवून आस्वाद घ्या.
पापड करी दह्यासोबतही खूप छान लागते.