Knee Pain: गुडघेदुखीने हैराण आहात? तरुणांपासून वृद्धांपर्यंत गुडघेदुखीवर रामबाण ठरणार 'हा' व्यायाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डॉक्टरांचा खास सल्ला

गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या अनेकांना औषधांनी फायदा होत नाही. अशांसाठी डॉक्टरांचा खास सल्ला आणि नवा उपाय वेदना कमी करण्यात मदत करू शकतो.

गुडघेदुखीवर उपाय

गुडघेदुखीवर उपाय म्हणून एक सोपा व्यायाम सुचवला असून, नियमित केल्यास वेदना लवकर कमी होतात.

व्यायाम

क्रीडा विज्ञान आणि पुनर्वसन विभागाचे तज्ज्ञ, यांनी गुडघेदुखीवर उपाय म्हणून 'रेट्रो वॉकिंग' हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

रेट्रो वॉकिंग

गुडघ्याच्या पुढील भागातील वेदना, लवकर ऑस्टियोआर्थरायटिस किंवा दुखापतीनंतर पुनर्वसनासाठी 'रेट्रो वॉकिंग' हा व्यायाम अतिशय फायदेशीर ठरतो, असे डॉक्टर सांगतात.

गुडघेदुखीवर प्रभावी

रेट्रो वॉकिंग ही पारंपरिक चालण्यापेक्षा वेगळी असून, ती गुडघेदुखीवर प्रभावी ठरते आणि अनेकजण ती आता उपचारासाठी स्वीकारत आहेत.

स्नायूंना आराम

रेट्रो वॉकिंगमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि सांध्यांची हालचाल सुधारते. दररोज फक्त १०-१५ मिनिटे मागे चालल्याने गुडघेदुखी कमी होते.

मोठा आराम

दररोज रेट्रो वॉकिंग केल्याने गुडघेदुखीपासून मोठा आराम मिळू शकतो. मात्र, सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कमजोरी किंवा संतुलनाचा त्रास

रेट्रो वॉकिंग करताना घसरट जागा टाळा. ज्यांना वयोमानानुसार कमजोरी किंवा संतुलनाचा त्रास आहे, त्यांनी हा व्यायाम आधाराशिवाय करू नये.

NEXT: हनुवटीवरील ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळवा कायमचा आराम

येथे क्लिक करा