ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल ऑफिसमध्ये कामाची वेळ आणि ओझे वारंवार वाढत चालले आहे.
याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर तसेच शारिरीक आरोग्यावर देखील होतो.
यावर उपाय म्हणून तुम्हा काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.
तुमचा एक हात कमीत कमी ५ मिनिटे पोटावर ठेवा. श्वास घेताना पोट आत-बाहेर होण्यावर लक्ष केंद्रित करा.
२-३ मिनिटे डोळे बंद करा. एखादा आनंदाचा क्षण आठवा.
एखादी वस्तू डोळ्यासमोर ठेवा. सलग २-३ मिनिटे पापण्या न हलवता वस्तूकडे पाहत रहा.
थोडावेळ आजूबाजूला बघा. शांतपणे सभोवताली होणाऱ्या हालचालींचे निरिक्षण करा.
या ट्रिक्स तुमचा स्ट्रेस दूर करून मनःशांती मिळवून देण्यास मदत करतील.
यामुळे प्रसन्नता राहील आणि एकाग्रतेने काम करू शकाल.